Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केमवाडी येथे ग्रामदैवत श्री बोधगिरी महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; कलशारोहण सोहळा व ग्रंथराज पारायण रंगणार! केमवाडी नगरी सजली! बोधगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी; जाणून घ्या सप्ताहाचे पूर्ण वेळापत्रक.


"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे ग्रामदैवत समाधिस्त योगी श्री बोधगिरी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त २१ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ पासून या अध्यात्मिक सोहळ्याला सुरुवात होत असून यानिमित्ताने हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा व ग्रंथराज पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११ ते १२ गाथा भजन आणि दुपारी १२ ते २ पंगत (भोजन) होणार आहे. दुपारी २ ते ५ हरिनाम, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, तर रात्री ९ ते ११ कीर्तन आणि रात्री ११ नंतर हरिजागर असे भक्तीमय कार्यक्रम होणार आहेत.

दिग्गज कीर्तनकारांची लाभणार उपस्थिती
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपली सेवा रुजू करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने 
ह.भ.प. काका पाटील महाराज (दारफळ),ह.भ.प. घाटगेकर महाराज (मोहळ),ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले  ह.भ.प. मन्मथ महाराज (उळे),ह.भ.प. पिंटू घाडगे महाराज (मोहळ),ह.भ.प. माऊली महाराज (मेढेशिंगे),ह.भ.प. केमधारण महाराज (लोणी)
यांच्या रसाळ कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

कलशारोहण आणि महाप्रसाद
बुधवार, दि. १५ मे रोजी ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकर (दादा) बोधले महाराज (पंढरपूर) यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ८ वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे.

या सोहळ्याचे पूजन ह.भ.प. सुनील जोशी महाराज, ह.भ.प. तुकाराम गोसावी आणि ह.भ.प. भागवत जाधव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. समस्त भजनी मंडळ व केमवाडी ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली असून, परिसरातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments