Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटना एकवटली! तामलवाडी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; पत्रकारांच्या हितासाठी एकजुटीचा निर्धार; ​तामलवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष मगर, उपाध्यक्षपदी गणेश गायकवाड, तर सचिवपदी अप्पुराजे भोसले यांची बिनविरोध निवड;

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
​काटी | उमाजी गायकवाड 
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पत्रकार संघाची महत्त्वाची बैठक गुरुवारी (दि. ०९ एप्रिल) उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी कार्यकाळासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी संतोष मगर यांची दुसऱ्यांदा निवड करून त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर उपाध्यक्षपदी गणेश गायकवाड आणि सचिवपदी अप्पुराजे भोसले यांची वर्णी लागली आहे.

​सुयोग हॉस्पिटलमध्ये पार पडली बैठक
तामलवाडी येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये सकाळी ११ वाजता ही बैठक संपन्न झाली. मागील कार्यकारिणीची मुदत संपल्याने लोकशाही मार्गाने नवीन निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. नूतन पदाधिकाऱ्यांचे नाव जाहीर होताच सर्व उपस्थित पत्रकारांनी जल्लोष केला. निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून, शाल व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
​पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणार: गणेश गायकवाड
निवडीनंतर बोलताना नूतन उपाध्यक्ष गणेश गायकवाड यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रकारांच्या कायदेशीर अडीअडचणी सोडवणे आणि त्यांच्यावर होणारे अन्याय रोखण्यासाठी आपली संघटना सदैव तत्पर आणि एकजुटीने कार्य करेल."
​सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार: संतोष मगर
अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष मगर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "सर्व पत्रकार बांधवांनी माझ्यावर दुसऱ्यांदा जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी मी कटिबद्ध राहीन," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
​या मान्यवरांची होती उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस दै. तरुण भारतचे उपसंपादक अविनाश गायकवाड, दै. लोकमतचे संतोष मगर, दैनिक पुण्यनगरीचे काटी प्रतिनिधी तथा 'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवेचे मुख्य संपादक उमाजी गायकवाड, शिवरत्न न्यूजचे संपादक सर्जेराव गायकवाड, दै. एकमतचे दादा काडगावकर, दैनिक आरंभ मराठीचे गणेश गायकवाड, पत्रकार सचिन शिंदे, पत्रकार दत्तात्रय (अप्पुराजे) भोसले, पत्रकार साधू शिंदे आणि किसन पांडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

'Only न्युज धाराशिव' साठी उमाजी गायकवाड, काटी

Post a Comment

0 Comments