"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 निमित्त प्रवेश पात्र नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अधिराज अर्जुन यमगर याने 150 पैकी 110 गुण मिळवले, तर प्रगती विजयकुमार सरवदे हिने 150 पैकी 100 गुण मिळवत यश संपादन केले. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.तसेच शाळेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण डी. एम. व शिक्षिका श्रीमती घोडके एम. एस. यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments