Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भक्तीचा अनमोल नजराणा! श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी पुण्याच्या भाविकाकडून 'सव्वा पाच' तोळ्यांचे सुवर्ण मंगळसूत्र अर्पण

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
​तुळजापूर | उमाजी गायकवाड 
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या दातृत्वाचा ओघ सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील सोरपटवाडी येथील एका महिला भाविकाने आई राजाउदेच्या चरणी सुमारे ५१.८४० ग्रॅम (सव्वा पाच तोळे) वजनाचे आकर्षक सुवर्ण मंगळसूत्र अर्पण करून आपली मनोभावे भक्ती व्यक्त केली आहे.
​पुण्याच्या धामे कुटुंबाकडून भक्तीचा जागर
​मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील गणेश नगर (सोरपटवाडी) येथील रहिवासी सौ. मनिषा अंकुश धामे या आज आपल्या सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर नगरीत आल्या होत्या. देवीच्या दर्शनाने भारावून गेलेल्या धामे कुटुंबाने आपल्या आराध्य दैवताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे मौल्यवान मंगळसूत्र देवीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला.
​मंगळसूत्र अर्पण सोहळा
​आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात विधिवत दर्शनानंतर मनिषा धामे यांनी हे सुवर्ण मंगळसूत्र मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द केले. या मंगल प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने धामे कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी धार्मिक विभागाचे विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी व भाविक उपस्थित होते.
​भाविकांच्या दातृत्वाने तुळजापूर नगरी भारावली
​गेल्या काही दिवसांपासून तुळजाभवानी मातेच्या दरबारात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अर्पण केली जात आहे. मनिषा धामे यांनी अर्पण केलेल्या या मंगळसूत्रामुळे देवीच्या दागिन्यांच्या खजिन्यात आणखी एका मौल्यवान दागिन्याची भर पडली आहे. आई तुळजाभवानीवरील अढळ श्रद्धेपोटीच हे दान अर्पण केल्याची भावना धामे कुटुंबाने यावेळी व्यक्त केली.

​"आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सर्व काही प्राप्त झाले आहे. त्या कृतज्ञतेपोटीच देवीच्या चरणी हे मंगळसूत्र अर्पण करण्याचे भाग्य लाभले."
— मनिषा अंकुश धामे (भाविका, पुणे)

ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा 'Only न्यूज धाराशिव'!

Post a Comment

0 Comments