"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसमूह दैनिक 'पुण्य नगरी' आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य बक्षीस, पुण्य पुरस्कार आणि कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असून, यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
बक्षीस आणि पुरस्कारांचा वर्षाव
दैनिक 'पुण्य नगरी'च्या वतीने राबवण्यात आलेल्या २.५१ कोटी रुपयांच्या कूपन योजनेतील विजेत्यांना उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली जातील. तसेच, समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'पुण्य पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. याच सोहळ्यात जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरणही करण्यात येईल.
पुरस्कारार्थींची नामावली आणि पुण्य पुरस्काराचे मानकरी
वसंतराव नागदे (सहकार क्षेत्र)
ॲड. व्यंकटराव गुंड (रुपामाता उद्योग समूह)
डॉ. दिग्गज दापके (वैद्यकीय व सामाजिक)
अर्चना माने (महिला सक्षमीकरण - राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या)
बाळासाहेब जमाले (आदर्श शिक्षक)
डॉ. संदीप तांबारे (व्यसनमुक्ती कार्य)
हणमंत गवळी (प्रगतशील शेतकरी)
विठ्ठल चौधरी (पोल्ट्री उद्योग)
अमर सूर्यवंशी (आदर्श सरपंच)
पत्रकारिता पुरस्कार (शोधवार्ता व विशेष वार्ता)
बालाजी वडजे, अमोल मुळे, राजहंस कांबळे, रोशन मुल्ला, माधव आटकोटे, रमेश कदम, दिपक बारकुल आणि डॉ. रविंद्र भताने या पत्रकारांचा गौरव केला जाईल.
सोहळ्याची वेळ आणि स्थळ
दिनांक: रविवार, १२ एप्रिल २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, नगर परिषद जवळ,धाराशिव.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती:
या सोहळ्याला मंत्री भरत शेठ गोगावले, संजय शिरसाट, माजी मंत्री आ. डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, 'मित्रा'चे CEO प्रविणसिंह परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा 'पुण्य नगरी'चे जिल्हा संपादक धनंजय रणदिवे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.
Only न्यूज धाराशिव - आपल्या जिल्ह्याची आपली बातमी!
0 Comments