Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुक्यातील पवनचक्की खंडणी व दरोडा प्रकरणाला नवे वळण; दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर! ॲड. विराज जगदाळे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक; फिर्यादीच्या दाव्यातील त्रुटींवर ओढले ताशेरे

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | विशेष प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ-इटकळ रोडवर पवनचक्कीचे पाते घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवून खंडणी मागितल्याच्या आणि दरोडा टाकल्याच्या कथित प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला असून, ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी केलेला तडाखेबंद युक्तिवाद या निकालात महत्त्वाचा ठरला.

नेमके प्रकरण काय होते?
काही दिवसांपूर्वी मंगरूळ-इटकळ रोडवरील दत्त मंदिराजवळ 'सोरिजिन आर. ई. सर्विसेस प्रा. लि.' कंपनीचे पवनचक्कीचे पाते (ब्लेडर ट्रेलर) आणि रोड क्लिअरन्स गाडी जात होती. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गाडी अडवून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, अशी तक्रार फिर्यादीने दिली होती. यावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात BNS कलम ३०९(२) आणि ३०८(२) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती.

न्यायालयात काय घडले?
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या वतीने नामांकित विधिज्ञ ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना फिर्यादीने लावलेल्या आरोपांमधील तांत्रिक विसंगती आणि पुराव्यांचा अभाव याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. ॲड. जगदाळे यांनी आरोपींच्या बचावासाठी मांडलेले कायदेशीर मुद्दे आणि प्रबळ युक्तिवाद ग्राह्य धरत, माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या निकालामुळे कायदेशीर वर्तुळात ॲड.विराज जगदाळे यांच्या अभ्यासू युक्तिवादाची विशेष चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments