Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडीत प्रशासकीय आढावा बैठकीत माजी सैनिक शिवाजीराव सावंतांनी मांडला समस्यांचा पाढा; मूलभूत सुविधांसाठी आक्रमक मागणी!


​"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी  | उमाजी गायकवाड 
प्रशासकीय यंत्रणा लोकांच्या दारी नेण्याच्या उद्देशाने तुळजापूर पंचायत समितीमार्फत तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत गावातील प्रलंबित समस्या आणि मूलभूत सुविधांच्या अभावावरून 'आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे'चे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे माजी सैनिक शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी प्रशासनाला धारेवर धरत निवेदनाद्वारे विविध मागण्यांचा पाढा वाचला.

​पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी तामलवाडी परिसरातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती सावंत यांनी निवेदनाद्वारे केली.

​निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे:​
जलजीवन मिशन व रस्ते दुरुस्ती: जलजीवन मिशन योजनेचा पुरवणी आराखडा तयार करावा. तसेच या योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
​घरकुल योजना व एजंटांवर वचक: सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुल योजनेचे हप्ते त्वरित जमा करावेत आणि या प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या एजंटांवर कडक नियंत्रण मिळवावे.
​विकास निधीची प्रतीक्षा: अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी मागील चार वर्षांपासून निधी मिळालेला नाही. आगामी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी सावंत यांनी लावून धरली.
​शेत रस्ते व कर वसुली: जानेवारी २०२५ मध्ये सादर केलेल्या शेतरस्त्यांच्या प्रस्तावांना प्राधान्याने मान्यता द्यावी. तसेच, ग्रामपंचायत अधिनियम १९५९/६० च्या कलम १२९ नुसार, भांडवली मूल्यावर आधारित कंपन्यांचा थकीत कर जप्ती करून वसूल करावा, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडेल.
​प्रशासनाकडून दखल:
​यावेळी विस्तार अधिकारी (कृषी) दिलीप नडगिरी यांनी हे निवेदन स्वीकारले. या मागण्यांवर सकारात्मक विचार करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या प्रसंगी काटगाव जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती (दादा) माळी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

​या निवेदनाच्या प्रती तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांनाही देण्यात आल्या असून, तातडीने पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments