Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

"ग्रामीण गुणवत्तेचा गुगलमध्ये डंका! "युट्यूब ते गुगल व्हाया सावरगाव! प्रा.शामसुंदर माने यांच्या 'InspiringYou' कार्याची देशपातळीवर दखल." सावरगावचे प्रा.शामसुंदर माने देशातील ४ भाग्यवान क्रिएटर्समध्ये! "गुगल इंडियाच्या परिषदेसाठी तुळजापूर तालुक्यातील सावरगावच्या प्रा.शामसुंदर माने यांची निवड; बेंगळुरूमध्ये विशेष सन्मान


"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव सारख्या ग्रामीण भागातून जागतिक स्तरापर्यंत आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध युट्यूबर प्रा. शामसुंदर माने यांनी पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. Google India च्या अत्यंत मानाच्या 'User Research' उपक्रमांतर्गत आयोजित एक दिवसीय परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली असून, बेंगळुरू येथे पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

देशातील 'टॉप ४' क्रिएटर्समध्ये समावेश
गुगल इंडियाच्या या विशेष परिषदेसाठी संपूर्ण देशातील लाखो युट्यूब क्रिएटर्समधून केवळ ४ निवडक व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातून प्रा. शामसुंदर माने यांची झालेली निवड ही ग्रामीण भागातील कर्तृत्वाला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे. २ एप्रिल २०२६ रोजी बेंगळुरू येथील गुगलच्या कार्यालयात ही परिषद उत्साहात पार पडली.

.                    --प्रा.शामसुंदर माने, सावरगाव 

'InspiringYou' माध्यमातून शैक्षणिक क्रांती
प्रा. माने हे गेल्या १० वर्षांहून अधिक काळ 'InspiringYou' या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तरुणांना इंग्रजी भाषा, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे देत आहेत. त्यांच्या या निस्वार्थी आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल खुद्द YouTube India ने घेतली आहे. या परिषदेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी युट्यूब इंडियाकडून त्यांची सविस्तर मुलाखतही घेण्यात आली.

ग्रामीण गुणवत्तेचा जागतिक गौरव
सावरगाव सारख्या एका छोट्या गावातून तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रा. माने यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील तरुण जर जिद्द आणि चिकाटीने काम करत असतील, तर ते गुगलसारख्या जागतिक व्यासपीठावरही आपली छाप सोडू शकतात, हे प्रा. माने यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

या यशाबद्दल शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि सामाजिक स्तरातून प्रा. शामसुंदर माने यांचे कौतुक केले जात आहे.

✍️ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments