"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील बहुचर्चित पवनचक्की खंडणी व दरोडा प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद निर्णायक ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळ–इटकळ रोडवरील दत्त मंदिराजवळ सोरिजिन आर. ई. सर्विसेस प्रा. लि. कंपनीच्या पवनचक्कीचे पाते (ब्लेड) वाहून नेणाऱ्या ट्रेलरला मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अडवले. यावेळी शिवीगाळ करत फिर्यादीस मारहाण करण्यात आली तसेच एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याच दरम्यान फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले.
या घटनेप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(२), ३०८(२) अंतर्गत दि. १ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील अटक आरोपींच्या वतीने ॲड. विराज जगदाळे यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडत सविस्तर युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
या निर्णयामुळे तालुक्यातील या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments