Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

छत्रपती संभाजीनगरच्या भाविकाचे तुळजापुरात दान; देवीच्या चरणी १ लाखांची देणगी, मंदिर संस्थानकडून सन्मान

"Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी छत्रपती संभाजीनगर येथील एका निस्सीम महिला भक्ताने एक लाख रुपयांची रोकड देणगी स्वरूपात अर्पण केली आहे. मालती खानापूरकर असे या देणगीदार महिला भाविकाचे नाव असून, मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आणि श्री तुळजाभवानी देवीच्या निस्सीम भक्त मालती खानापूरकर या आज (गुरुवारी) आपल्या मुलासह आणि मुलीसह तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. आई भवानीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर संस्थानच्या कार्यालयात जाऊन एक लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली.

संस्थानकडून कृतज्ञता पूर्वक सन्मान
भाविकाने दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल मंदिर संस्थानच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) उपेंद्र तामोरे यांच्या हस्ते मालती खानापूरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी खानापूरकर परिवाराला श्री तुळजाभवानी देवीची देखणी प्रतिमा आणि महावस्त्र भेट देण्यात आले. या छोटेखानी सत्कार सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments