Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

परंड्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; ५७ हजारांच्या नशेच्या गोळ्यांसह आरोपी जेरबंद

धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
 परंडा शहरात बेकायदेशीरपणे नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमावर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५७,२४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परंडा शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला (ANTF) परंडा शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे टास्क फोर्सचे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने दोन पंच आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) निरीक्षकांच्या उपस्थितीत १५ जून २०२६ रोजी सायंकाळी १७.०० वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला.

झाडाझडतीत लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या शाहीद सादीक शेख (वय ३९, रा. परंडा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेऊन त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे खालील प्रतिबंधित अमली पदार्थ आणि साहित्य आढळून आले:

Niteor-10 (Nitrazepam घटक): ६,००० रुपये किमतीच्या एकूण १५ गोळ्या.

Nizascen-10 (Nitrazepam घटक): ४,००० रुपये किमतीच्या एकूण १० गोळ्या.

Anzilum 0.5 (Alprazolam घटक): ३७,२०० रुपये किमतीच्या एकूण ९३ गोळ्या.

मोबाईल: नशेच्या गोळ्यांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणारा ३७,२०० रुपये किमतीचा एक विवो (Vivo) कंपनीचा मोबाईल फोन.

पोलिसांनी एकूण ५७,२०० रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल
हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी शाहीद सादीक शेख याला परंडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यानंतर सफौ/वाहेद मुल्ला यांनी त्याच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९०/२०२६ नुसार NDPS Act चे कलम 8(C), 22(A) सह औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा कलम १८(क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर यशस्वी कारवाई अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह मॅडम, पोलीस अधीक्षक श्री. अ‍ॅड. अजित टिके साहेब, आणि डी.वाय.एस.पी. श्री. साईनाथ ठोबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सपो उपनि वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, हरीशचंद्र मुंढे आणि ज्योती किर्तीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments