तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले आदरणीय श्री. मधुकर गायकवाड आज दि. 4/7/2026 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शांत, संयमी आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गात त्यांच्याविषयी विशेष आदर आहे.
गायकवाड सर यांनी आपल्या कार्यकाळात कुशल नेतृत्व, सकारात्मक विचार आणि शिक्षकांप्रती असलेल्या आत्मीयतेतून प्रत्येक वस्ती शाळा शिक्षकाला वैयक्तिक मदत केली. सेवासातत्याचा प्रश्न असो की इतर अडचणी, त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन तोडगा काढला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले.
त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शिक्षक भारतीच्या वतीने भावनिक निरोप देण्यात आला. यावेळी सहकाऱ्यांनी सांगितले की, "आपला शालेय परिसरातील सहवास आजपासून थांबेल याचे दुःख आहे. आपला साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आम्हा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहील. आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले."
सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य, आनंदी आणि समाधानाचे दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुख्य संपादक उमाजी गायकवाड
तुळजापूर/काटी
0 Comments