काटी | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक महादेव शंकर साळुंके (वय ८०) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साळुंके परिवारावर शोककळा पसरली आहे.
स्व. महादेव साळुंके हे धाराशिव येथील प्रसिद्ध 'अंजू ॲटो सर्व्हिस सेंटर'चे सर्वेसर्वा बाबासाहेब साळुंके तसेच काटी येथील प्रगतशील शेतकरी मधुकर साळुंके यांचे वडील होते. आपल्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावामुळे त्यांनी गावात मोठा आपुलकीचा संग्रह निर्माण केला होता.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ठीक १.०० वाजता धाराशिव येथील कपिलधरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, एक भाऊ, भावजय असा मोठा आप्तपरिवार आहे.
0 Comments