Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सरस्वती विद्यालयात शिक्षक-पालक संघाची उत्साहात स्थापना! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे मसुते बसवण्णाप्पा यांचे आवाहन


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नामांकित सरस्वती विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी 'शिक्षक–पालक संघाची' (PTA) स्थापना अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सोमवार, दिनांक १३ जुलै रोजी विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. विद्यालय आणि पालकांमधील समन्वय अधिक दृढ करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला गती देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. मसुते बसवण्णाप्पा हे होते. तर व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुहास वडणे सर, पर्यवेक्षक श्री. महादेव मसुते आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

पालकांचे सहकार्य गरजेचे : मसुते बसवण्णाप्पा

"विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार आणि स्पर्धात्मक दृष्टीकोन अंगीकारला पाहिजे. यासाठी संस्था व विद्यालयामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनीही विद्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून सहकार्य करावे."
— श्री. मसुते बसवण्णाप्पा (अध्यक्ष)

विद्यालयाच्या उपक्रमांची माहिती
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य सुहास वडणे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, गुणवत्ता विकास मोहीम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शासनाच्या विविध लाभार्थी शिष्यवृत्ती योजना आणि शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला. तसेच विद्यार्थ्यांच्या यशात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या शिक्षक–पालक संघ स्थापनेमुळे विद्यालय व पालक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीला निश्चितच मोठी चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित पालकांनी व शिक्षकांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन श्री. बट्टलवाड सर यांनी केले, तर शेवटी उपस्थित सर्व पालकांचे आभार श्री. राऊत सर यांनी मानले. या बैठकीला तामलवाडी व परिसरातील पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments