Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

झेडपी प्रशाला सावरगावला ‘उत्कृष्ट शाळा पुरस्कार’; गुणवंतांचाही डामडौलात सत्कार!

'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धाराशिवच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात जिल्हा परिषद प्रशाला सावरगावला वर्ष २०२६ चा ‘उत्कृष्ट शाळा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. दहावीच्या परीक्षेत शाळेने मिळवलेल्या ९६.६५% या दैदिप्यमान निकालाची दखल घेत जिल्ह्यातील अवघ्या ५ शाळांमध्ये सावरगाव प्रशालेने पटकावलेले हे मानाचे स्थान कौतुकाचा विषय ठरले आहे.

याच दिमाखदार सोहळ्यात प्रशालेतील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियवंदा म्हाडदळकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, नागेश मापारी, सुधा साळुंखे, दयानंद जटनुरे, अनुप शेंगुलवार, निलेश काळे, तुळजापूरचे गटशिक्षणाधिकारी श्री. मल्लिनाथ काळे, सभापती श्री. विश्वास कोकने, सिद्धेश्वर कोरे, पूजाताई शिंदे, भाऊसाहेब खरसडे, दयानंद शिंदे आणि काटी जि.प. गटाचे सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब भाले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

गुणवंतांचे कौतुक अन् त्रिशतक!
दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश होता:

ज्ञानेश्वरी बलभीम डोके

बद्रीनाथ रामचंद्र राऊत

श्रावणी महेश मगर

गणेश लक्ष्मण भडंगे

अध्यक्ष अतुल पवार यांचा विशेष सत्कार
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल अध्यक्ष अतुल पवार यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सावरगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
हा मानाचा पुरस्कार प्रशालेचे मुख्याध्यापक रमाकांत गुरव, ज्येष्ठ शिक्षक मारुती काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल पवार यांच्यासह उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी स्वीकारला.

या घवघवीत यशामागे प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, सावरगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे वेळोवेळी मिळालेले मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन कारणीभूत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. या पुरस्कारामुळे सावरगाव परिसरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments