Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा तुळजापुरात; कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे घेतले मनोभावे दर्शन! जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते विशेष सत्कार; आमदार विक्रम काकडेंचीही उपस्थिती

तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
भारतीय टी-20 क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार तिलक वर्मा याने शुक्रवार (दि. १७) रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी हजेरी लावत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या तिलकने देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले आणि आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी आशीर्वाद मागितले.

टिळक वर्मा तुळजापुरात येणार असल्याची माहिती मिळताच मंदिर परिसरात क्रीडाप्रेमींनी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

संस्थानतर्फे शाही स्वागत आणि सत्कार
या दौऱ्यादरम्यान धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी तिलक वर्मा यांचे मंदिर संस्थानच्या वतीने जंगी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिलक वर्मा याला श्री तुळजाभवानी देवीची अत्यंत देखणी प्रतिमा आणि पवित्र महाप्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. मंदिर प्रशासनाच्या वतीने त्याला भावी क्रिकेट प्रवासासाठी आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

दिग्गजांची उपस्थिती
या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे, यांनीही उपस्थित राहून तिलक वर्माचे स्वागत केले. या महत्त्वपूर्ण भेटी दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने, यांच्यासह मंदिराचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

हा हाय-प्रोफाइल दौरा तुळजापूर शहर आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.

Post a Comment

0 Comments