Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भावी पिढीच्या आरोग्यासाठी 'एकलव्य'चा ध्यास! मंगरूळच्या विद्या संकुलात विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न

मंगरूळ -यमगरवाडी येथील श्री एकलव्य विद्या संकुलात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करताना डॉ. प्रशांत वडणे, डॉ. करंजकर मॅडम, सिस्टर जनाबाई कापसे, विवेक कदम, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब मगर व इतर.

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
'शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरुस्त' हा संदेश उराशी बाळगत तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ- यमगरवाडी येथील श्री एकलव्य विद्या संकुलात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत आणि तत्पर वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी, डोळे, दात, हिमोग्लोबिन आणि इतर प्राथमिक आजारांचे निदान करण्यात आले. तसेच, गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना जागीच मोफत औषधोपचार पुरवण्यात आले. केवळ तपासणीवर न थांबता विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात स्वच्छता, योग्य आहार आणि व्यायामाचे महत्त्व डॉक्टरांनी सोप्या भाषेत पटवून दिले.

'निरोगी आरोग्याकडून शैक्षणिक प्रगतीकडे!' – मंगरूळच्या एकलव्य विद्या संकुलात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी विषयी मार्गदर्शन करताना आरोग्य पथक..

या आरोग्य शिबिरासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वडणे, डॉ. करंजकर मॅडम, आरोग्य परिचारिका सिस्टर जनाबाई कापसे आणि विवेक कदम यांनी विशेष परिश्रम घेत सर्व विद्यार्थ्यांची आपुलकीने तपासणी केली.

या स्तुत्य उपक्रमाच्या प्रसंगी अण्णासाहेब मगर, विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेने सामाजिक भान जपत राबवलेल्या या उपक्रमाचे यमगरवाडी परिसरातून आणि पालकांमधून भरभरून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments