Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडीचे मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार 'उत्कृष्ट मंडळ अधिकारी' पुरस्काराने सन्मानित; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान; रस्ते विवाद समोपचाराने मिटवल्याबद्दल विशेष गौरव

परंडा येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना श्रीनिवास पवार.'

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
महसूल प्रशासनात उल्लेखनीय आणि समाजाभिमुख कामगिरी केल्याबद्दल तामलवाडी (तालुका तुळजापूर) येथील मंडळ अधिकारी श्री. श्रीनिवास सतीश पवार यांना सन २०२५-२०२६ या वर्षातील ‘उत्कृष्ट मंडळ अधिकारी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. परंडा येथे आयोजित भव्य महसूल दिन सोहळ्यात धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री. श्रीनिवास पवार हे सन २०१२ पासून महसूल विभागात कार्यरत असून, सन २०२४ पासून ते तुळजापूर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तामलवाडी मंडळ विभागात आपली सेवा बजावत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय कामकाजासोबतच निवडणूक, जनगणना, दैनंदिन महसूल कामकाज आणि ‘महाराजस्व अभियान’ यांसारख्या विविध शासकीय योजनांमध्ये महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय योगदान दिले आहे.

विशेषतः तामलवाडी मंडळ विभागातील विविध गावांमधील शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शेत-रस्त्यांचे वाद त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि समोपचाराने मिटवले. त्यांच्या या लोककल्याणकारी व समाजाभिमुख उपक्रमांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून त्यांना हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. पवार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तामलवाडीचे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि तमलवाडी मंडळ विभागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments