Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेची मुदत वाढवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा; तुळजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन; नवीन न्यायालय परिसरात बस थांबा करण्याची

तुळजापूर | Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा

 तुळजापूर शहर व तालुक्यातील महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC स्मार्ट कार्ड) सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या योजनेची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नगरसेवक तथा गटनेते अमोल माधवराव कुतवळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक आणि तुळजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्याचे काम Ebix Limited या खाजगी एजन्सीला देण्यात आले आहे. मात्र, तुळजापूर शहर व ग्रामीण भागात अद्याप अनेक नागरिक या कार्डपासून वंचित आहेत. शिवाय, सदर कंपनीचे प्रतिनिधी प्रत्येक गावात नागरिकांकडून ४०० ते ५०० रुपयांची बेकायदेशीर मागणी करत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अशा बेकायदेशीर वसुली करणाऱ्या कंपनीला तत्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे आणि सर्वसामान्यांची लूट थांबवावी, अशी मागणी कुतवळ यांनी केली आहे.

नवीन न्यायालय परिसरात बस थांबा करण्याची मागणी नलदुर्ग रोडवरील नवीन न्यायालय परिसरात तुळजापूर आगारातील जाणाऱ्या-येणाऱ्या बसला थांबा (Stop) मंजूर करण्यात यावा, जेणेकरून वकील, पक्षकार आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल, असे दुसरे निवेदनही यावेळी आगार व्यवस्थापकांना देण्यात आले.

सदर मागण्यांवर तातडीने योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन देतेवेळी नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, अक्षय धनंजय कदम, शेख तौफीक वलीमहंमद, सचिन खंडू जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments