Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांना विशेष सन्मान; पुण्यात ३ सप्टेंबरला ‘लिंगायत भूषण २०२६’ सोहळ्याचे आयोजन; ज्येष्ठ नेते शरद पवार, औसेकर महाराज व श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती

'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
पुणे: कर्नाटकातून महाराष्ट्रात स्थलांतरित होऊन विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तृत्ववान बांधवांचा गौरव करण्यासाठी गुरुवारी (३ सप्टेंबर) पुण्यात ‘सत्कार समारंभ सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित के.एल.ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रभाकर कोरे यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

हा सोहळा गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात (स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ) रंगणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्र पवार, पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या मान्यवरांना 'लिंगायत भूषण २०२६'
समाजात सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक योगदान देणाऱ्या आठ मान्यवरांना या कार्यक्रमात ‘लिंगायत भूषण २०२६’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यामध्ये दानशूर बसलिंग खेडगी (अक्कलकोट), मल्लिकार्जुन उमदी, विश्वनाथ महंताशेट्टर, शिवलिंग ढवळेश्वर, शंकरगौडा हादीमनी, शिवनगौड नंदेप्पागौडर, चंद्रशेखर डोळी व चंद्रशेखर पाटील यांचा समावेश आहे. सोहळ्यात 'लिंगायत समाज गौरव' व 'स्मृती गौरव' स्मरणिकेचे विमोचनही केले जाणार आहे.

"लिंगायत समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील योगदानाचा सन्मान करणे ही गौरवाची बाब असून हा सोहळा नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा देईल. या सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे."
— ओमप्रकाश कोयटे (अध्यक्ष, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन) व सुनील रुकारी (अध्यक्ष, लिंगायत संघर्ष समिती)

Post a Comment

0 Comments