"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
तुळजापूर पंचायत समितीचे कार्यतत्पर सभापती मा. श्री. विक्रमसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज शासकीय विश्रामगृह येथे स्नेहभेटी आणि शुभेच्छांचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी दैनिक पुण्यनगरीचे काटी प्रतिनिधी तथा 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवेच्या वतीने मुख्य संपादक उमाजी गायकवाड यांनी सभापती महोदयांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.
शुभेच्छांची रंगली मैफल
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि जनसंपर्काचा दांडगा अनुभव असलेले नेतृत्व म्हणून विक्रमसिंह देशमुख यांची ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहावर गर्दी झाली होती.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी काटीचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. सुनील बनसोडे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांशी संवाद साधताना सभापती देशमुख यांनी, मिळालेल्या शुभेच्छा हीच पुढील कार्याची शिदोरी असल्याचे भावना व्यक्त केल्या.
कार्यतत्पर नेतृत्वास शुभेच्छा
ग्रामपंचायत सदस्य ते पंचायत समिती सभापती असा राजकीय प्रवास करणाऱ्या विक्रमसिंह देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या याच निस्वार्थी कार्याची दखल घेत काटी ग्रामस्थांच्या वतीने आज शनिवारी सायंकाळी 7 वाजता काटी येथील मुख्य बाजार चौकात भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
'Only न्युज धाराशिव' व दैनिक पुण्यनगरी परिवाराच्या वतीने सभापती विक्रमसिंह देशमुख यांना उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!
0 Comments