Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

युवकांसाठी मोठी संधी! धाराशिवमध्ये 'युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर' (YLTP) चे आयोजन; व्यक्तिमत्व विकासासह करिअरला मिळणार नवी दिशा

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
धाराशिव | उमाजी गायकवाड 
महाराष्ट्र शासन आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग' यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिवमध्ये युवकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 'युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर' (YLTP - कर्मयोग) चे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवकांसाठी हे निवासी शिबिर असून, याद्वारे युवकांना नेतृत्व गुणांसोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे धडे दिले जाणार आहेत.

काय आहे 'कर्मयोग' (YLTP) शिबिर?
हे शिबिर युवकांच्या सर्वांगीण विकासावर आधारित असून यामध्ये जगप्रसिद्ध 'सुदर्शन क्रिया' शिकवली जाणार आहे. या प्रशिक्षणाचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

कौशल्य विकास: नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व कौशल्यांचा विकास करणे.

मानसिक आरोग्य: भावनांवर नियंत्रण, तणावमुक्ती आणि भीतीमुक्त जगण्याचे रहस्य.

आत्मविश्वास: निर्णयक्षमता वाढवणे आणि व्यक्तिमत्व विकास.

करिअर मार्गदर्शन: करिअरला योग्य दिशा देणे आणि व्यवस्थापन कौशल्य शिकवणे.

आरोग्य: योग, प्राणायाम आणि ध्यानाद्वारे शारीरिक सुदृढता.

कार्यक्रमाचा तपशील:
कोर्सचा कालावधी: २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२६.
रिपोर्टिंग: १९ एप्रिल २०२६, सायंकाळी ५ वाजेनंतर.
वयोमर्यादा: १८ वर्षे पूर्ण (निवासी कोर्स).
देणगी मूल्य: २,०००/- रुपये (भोजन व निवासासह).
ठिकाण: तेरणा पब्लिक स्कूल, बार्शी नाका, धाराशिव.

नोंदणीसाठी संपर्क:
या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
धाराशिव संपर्क: ९९२२१६९३७४, ९९२२८५०१८२, ९६५७६९७९५९
तुळजापूर संपर्क: ७७४४०५६८५७, ९४५३५७७५२१, ९४२३५७७५२१, ९७०४६७६६७६, ९४२२०७०६०४
ऑनलाईन नोंदणी: इच्छुक उमेदवार https://aolt.in/998461 या लिंकवर किंवा पत्रिकेवरील QR Code स्कॅन करून आपली नोंदणी निश्चित करू शकतात.

आपल्या भागातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा - 'Only न्यूज धाराशिव'

Post a Comment

0 Comments