Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

📰 Only न्यूज धाराशिव ; तुळजापूर पंचायत समितीतर्फे बळीराजासाठी स्तुत्य उपक्रम: निम्म्या दरात फवारणी पंप आणि वॉटर फिल्टरचे वाटप! आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पंचायत समितीचा शेतकरीहितैषी पुढाकार; ५० टक्के सवलतीत वाटप सुरू!तुळजापूर पंचायत समिती सभापती विक्रमसिंह (मालक) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बळीराजासाठी विशेष सवलत योजना!

तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
बळीराजाला दिलासा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील आरोग्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुळजापूर पंचायत समितीच्या वतीने एक विशेष आणि स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजपचे तुळजापूर विधानसभेचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व शेतकरी व ग्रामस्थांसाठी औषधी फवारणी बॅटरी पंप, डबल मोटर पंप तसेच वॉटर फिल्टर ५० टक्के सवलतीच्या दरात (निम्म्या दरात) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

गुरुवार, २३ जुलै २०२६ पासून सुरु झालेली ही विशेष सवलत योजना येत्या गुरुवार, ३० जुलै २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या उपक्रमास युवा नेते मल्हार पाटील, नगराध्यक्ष विनोद (पिटू भैया) गंगणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष दादा बोबडे, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब भाले, सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व सवलतीचे दर:
सिंगल मोटर फवारणी पंप: मूळ किंमत ₹३,१०० ऐवजी केवळ ₹१,५९९/- मध्ये.

डबल मोटर फवारणी पंप: मूळ किंमत ₹३,९०० ऐवजी केवळ ₹२,२५०/- मध्ये.

वॉटर फिल्टर: मूळ किंमत ₹१०,५०० ऐवजी केवळ ₹४,४९९/- मध्ये.

वारंटी आणि गुणवत्ता:
उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या औषध फवारणी पंपावर, बॅटरीवर आणि मोटरवर ६ महिन्यांची वॉरंटी देण्यात येणार आहे. तर वॉटर फिल्टरसाठी १ वर्षाची वॉरंटी उपलब्ध राहील. (टीप: वॉटर फिल्टर फिटिंग चार्जेस अतिरिक्त राहतील.)

आवश्यक कागदपत्रे व ठिकाण:
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सोबत खालील कागदपत्रे घेऊन पंचायत समिती, तुळजापूर (जि. धाराशिव) येथे उपस्थित राहावे:
१. आधार कार्ड किंवा रेशन कार्ड (झेरॉक्स प्रत)
२. १ पासपोर्ट साईझ फोटो

कृषी संकटाच्या काळात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि त्यांना उत्तम दर्जाची साधने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या या योजनेचा तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी व ग्रामस्थांनी वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments