Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तीर्थ (बु.)च्या विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; शाळा, रस्ते, मंदिर सुशोभीकरणासह आठ विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर : उमाजी गायकवाड 
तालुक्यातील तीर्थ (बु.) गावातील विविध प्रलंबित विकासकामांना जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या विविध कामांकडे निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. यामध्ये तीर्थ (बु.) येथील प्राथमिक शाळेसाठी पाच नवीन वर्गखोल्या बांधणे, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे तसेच गावातील शासकीय जागांना तारांचे कंपाउंड करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय ग्रामपंचायत व गावातील विविध सामाजिक सभागृहांची दुरुस्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. गावातील श्री भैरवनाथ मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

गावातील नागरिकांसाठी ओपन जिमची सुविधा उपलब्ध करून देणे, सर्व हातपंपांची दुरुस्ती करणे, तसेच जिल्हा परिषद शाळेत हायमास्ट लॅम्प बसवून नवीन पाण्याची टाकी उभारणे, या मागण्यांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.

गावातील मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक विकासाला चालना देण्यासाठी या कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सौ. माडजे यांनी केली आहे. या मागण्यांमुळे तीर्थ (बु.) गावातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु.) गावाच्या विकासासाठी आठ महत्त्वपूर्ण कामांचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून, आता या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments